सुस्वागतम....जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,गोसावीदरा आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

Sunday, September 9, 2018

अपूर्व विज्ञान मेळावा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोसावीदरा (देवठाण) येथे अपूर्व विज्ञान मेळावा...





           शनिवार,दि.८/०९/२०१८ रोजी शाळेत अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. देवठाण गावच्या सरपंच मा.सौ.रोहिणी सोनवणे, शाळा व्य.समिती अध्यक्ष मा.श्री.हिरामण गायकवाड तसेच ज्येष्ठ कवी मा.श्री.मनोहरबाबा शेळके यांनी विज्ञान मेळाव्याचे उदघाटन केले.

           इयत्ता ४थी ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयातील विविध प्रयोगांचे सादरीकरण यावेळी केले. भिंगाचे गुणधर्म, पाण्याची घनता, पदार्थ हे सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात, उष्णतेचे वहन, पाण्याचे शुद्धीकरण, चुंबकाचे गुणधर्म, घन कचऱ्याचे वर्गीकरण,  संप्लवन, मृदा निर्मिती, मसाल्याचे पदार्थ व उपयोग, अन्न टिकवण्याच्या पद्धती, अन्नातील भेसळ ओळखणे, कप्पीचे उपयोग, स्पर्शज्ञानाने वस्तू ओळखणे इ. विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोगाचे साहित्य जमवून प्रयोग सादर केले.

             या अपूर्व विज्ञान मेळाव्याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होईल. प्रत्येक गोष्ट पडताळून पाहण्याची सवय विद्यार्थ्यांना लागेल. असे मनोगत यावेळी सरपंच, मा.सौ.रोहिणी सोनवणे यांनी व्यक्त केले.

           सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

           त्याची काही क्षणचित्रे...
















No comments:

Post a Comment